म्हाडाची परीक्षा १२, १५ आणि १९ डिसेंबरला

   MPSC ची परीक्षा ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर होणार असल्याने म्हाडाची परीक्षा १२, १५ आणि १९ डिसेंबरला दोन्ही सत्रामध्ये घेतली जाईल
म्हाडा भरतीच्या परीक्षेची (Mhada Recruitment Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. म्हाडातर्फे याआधी देण्यात आलेल्या सुचनेनुसार ही परीक्षा ५ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी होणार होती. पण आता म्हाडातर्फे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

     म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत
भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत
व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी
सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक,
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ
लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या रिक्त जागांसाठी परीक्षा १२, १५ आणि १९ डिसेंबरला दोन्ही सत्रामध्ये घेतली जाईल

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *