महाराष्ट्रात 10001 जागेची शिक्षक भरती; जाणून घ्या कशी होईल निवड

Maharashtra state government has decided to recruit for 10000 teaching post across the maharashtra through a Pavitra portal. Of these, Scheduled Castes – 1704, Scheduled Tribes – 2147, Scheduled Tribes (PESA) – 525, VJA – 407, N. T.B. 240, NTC-240, NTD – 99, Imav- 1712, EWS-540, SBC-209, SEBC-1154 and 924 for general category. The first teachers recruitment conducted by the Pavitra Portal The advertisement of this mega recruitment was displayed on the Pavitra web portal in the presence of Chief Minister Devendra Fadnavis and  Education Minister Vinod Tawde.
राज्यसरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
अनुसूचित जातींसाठी १७०४
अनुसूचित जमातींसाठी २१४७
अनुसूचित जमातींसाठी (पेसा) ५२५
व्हिजेएसाठी ४०७
एनटिबीसाठी २४०, 
एनटीसीसाठी २४०
एनटीडीसाठी १९९
इतर मागास वर्गासाठी- १७१२ 
इडब्ल्यूएससाठी ५४० 
एसबीसीसाठी २०९ 
एसईबीसीसाठी ११५४  
सर्वसाधारण – ९२४  
पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी तसेच सर्वांसाठी दि. २/३/२०१९ पासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दि. ११/३/२०१९ पासून उपलब्ध होईल.  

ऑनलाईन अर्ज व प्रधान्यक्रम 
इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करतील. पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दि. ११/३/२०१९ पासून उपलब्ध होईल. स्थानिक स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधन्यक्रम देतील.उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करुन प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. 

निवड सूची –
उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवड सूची जाहिर करतील. उमेदवारांच्या अर्हतेनुसार ते ज्या पदांसाठी पात्र असतील त्या पदांसाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक असा राहिल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस देखील त्यांच्या Login वर उच्चत्तम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची उपलब्ध होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियुक्ती प्राधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील रिक्त पदावर निवडसूचीतील उमेदवारांची नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात करतील. विहित कालावधीत नियुक्तीसाठी हजर न राहिलेला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेतील भरती प्रक्रीयेतून बाद होईल.

खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुलाखत- एकूण ३० गुण 

     खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांकरीता प्रत्येक रिक्त जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह १:१० या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर शिक्षण संचालक उपलब्ध करुन देतील. संबधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉगिनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवडसूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन व त्यांची अध्यापन कौशल्ये तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील. मुलाखत व अध्यापन कौशल्याव्दारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहिर करतील. त्याच बरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्यांचा निकाल व्यक्तिश: कळवतील. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची नियुक्ती ७ कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल.
           निवड झालेला उमेदवार ७ कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करेल.
मूळ कागदपत्रांची तपासणी –
   संबधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेव्दारे संबधित उमेदवारास नियुक्ती पत्र दिल्यानंतर शिक्षण सेवक पदी रुजू होण्यापूर्वी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांची (शालान्त/उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापिठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी/पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता) creamylayer प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता परीक्षा(इ.१ ली ते ८ वी करीता) / अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण (महिला/दिव्यांग/खेळाडू इत्यादी)), त्या-त्या प्रवर्गात आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियुक्ती प्राधिकारी ३ (तीन) कार्यालयीन दिवसांत करतील. खाजगी शैक्षणिक संस्था निवडसूचीतील उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान वरील सर्व कागदपत्रांची तपासणी करतील.

नियुक्त पत्र –
    छाननी अंती मुळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था वर नमूद केल्याप्रामणे तीन दिवसांच्या कालावधीत ई-मेल व्दारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्त पत्र पाठवेल.
ऑनलाईन रुजू  करणे-
उमेदवाराने नियुक्त पत्रास सात दिवसांच्या आत स्वीकृती कळविणे बंधनकारक राहिल. अशी स्वीकृती दिल्यानंतर संबंधित शाळेचा मुख्याध्यापक त्या उमेदवारास शिक्षण सेवक म्हणून “पवित्र” संगणकीय प्रणाली व्दारे ऑनलाईन रुजू करुन घेतील. तसा रुजू अहवाल प्रणालीवर भरतील. त्यामुळे सदर शिक्षण सेवकाची माहिती “सरल” संगणक प्रणालीवर आपोआप अद्ययावत होईल व “शालार्थ” प्रणालीसाठी उपलब्ध राहिल. 
         निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने रुजू करुन न घेतल्यास अशा संस्थांच्या शाळेतील संबधित पद व्यपगत करण्यात येईल.
खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये नियुक्तीसाठी विचार 
उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत निवड झाल्यास त्याचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावा.
निवडीनंतर गुण बाद –
संबंधित संस्थेव्दारे नियुक्तीपत्र पाठविल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचे त्या तारेखे पर्यंतचे गुण बाद ठरविण्यात येतील. अर्थात प्राप्त गुणांचा उपयोग एका पेक्षा अधिक नियुक्तीसाठीकरता येणार नाही. 
खालील परिस्थितीमध्ये उमेदवारांना दुसरी नियुक्ती स्वीकारण्याची परवानगी राहील:
(१) पहिली नियुक्ती विनाअनुदानित/अंशत: अनुदानित/शासकीय अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शाळेत झाली असल्यास आणि सध्याचा अर्ज अनुदानीत संस्थेकरीता असल्यास.
(२) उमेदवाराने आपल्या पाच संधीची मर्यादा संपविली नसल्यास, त्यास पुन्हा चाचणी देऊन नवीन गुण मिळविता येतील हे नवीन गुण प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत वापरता येतील.
इतर महत्वाचे-
 उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास, संबंधित उमेदवाराची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्तते अंती याच किंवा सुधारीत गुणाच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील.
शिक्षण सेवकाच्या नियुक्तीच्या कालावधी-
 स्थानिक स्वराज्य संस्था व पूर्णत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षण सेवकांचा परिविक्षाधीन कालावधी दिनांक २७.०२.२००३ तसेच दिनांक १३.१०.२००० च्या शासन निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे तीन वर्ष राहील.
 अंशत: अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त सह शिक्षकांचा परिविक्षाधीन कालावधी सर्वसाधारणपणे २ वर्ष राहिल. 
शिक्षण सेवकाची वयोमर्यादा :- 
शिक्षण सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता ३८ वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४३ वर्ष राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वर्यामर्यादेबाबत शासन, वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल.

(सूचना– हि माहिती जाहिरातीतील माहिती नसून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि ०७/०२/२०१९  च्या आधारे संकलित केलेली आहे तरी उमेदवारांनी शासनाची जाहिरात पाहूनच पुढील कार्यवाही करावी)

नवीन माहितीसाठी join करा Exammantra टेलिग्राम चॅनेल

वेबसाईट लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *